शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, इस्लामपुरात दलबदलू नेत्यांनाच भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:24 IST

अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले

अशोक पाटीलइस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना पाठबळ देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाटील यांना विसर पडत चालला आहे. राजकारणातील बदलत्या समीकरणांतून दलबदलू कार्यकर्त्यांचा भाव वधारत चालला आहे, अशी खंत राष्ट्रवादीतील जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक शंकरराव पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.राजारामबापू यांच्या निधनानंतर विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ आणि बापूंनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था पोरक्या झाल्या. बहुतांशी कार्यकर्त्यांतून बापूंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जयंत पाटील यांचे नाव पुढे आले. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. परंतु उरुण परिसरातील बहुतांशी बापूप्रेमी कार्यकर्त्यांनी जयंतरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मी एक कार्यकर्ता होतो. परंतु जयंतरावांचा वाढता राजकीय आलेख पाहून इतर पक्षातील कार्यकर्त्यांची घुसखोरी झाली, याची खंत शंकरराव पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी राज्याच्या सत्तेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला. परंतु अलीकडील काळात आपला कोण, परका कोण, याचे आत्मपरीक्षणच केले जात नाही. ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ, असे नवीन सूत्र राजकारणात आले आहे. त्यातच अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्ते जयंतरावांपासून दूर गेल्याचे दिसत असल्याचाही दावा काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यापैकी मी एक असून, आता राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही जयंतरावांशी एकनिष्ठ आहे.भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमवइस्लामपूर मतदारसंघातील राजारामबापू उद्योग समूहात सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलांना न्याय दिला गेला नाही. नोकरीची गरज नसतानाही पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील नव्या पिढीला नोकऱ्या दिल्या गेल्याने नेत्यांना आता भाडेकरू कार्यकर्त्यांची जमावाजमव करावी लागत आहे, असे शंकरराव पाटील म्हणाले

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील