सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर
By संतोष भिसे | Updated: October 28, 2022 14:05 IST2022-10-28T14:00:45+5:302022-10-28T14:05:50+5:30
हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नसली, तरी नवा गूळ येऊ लागला आहे.

सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या महुर्तावर गूळ, हळद आणि बेदाण्याच्या सौद्यांचा शुभारंभ झाला. प्रशासक मंगेश सुरवसे, आणि सचिव महेश चव्हाण यांच्यासह माजी संचालक बाळासाहेब बंडगर, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, व्यापारी गोपाल मर्दा आदी उपस्थित होते.
मुहुर्ताच्या सौद्यामध्ये गुळाला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला. हळदीला ८ हजार ७५० रुपये, तर बेदाण्याला २०१ रुपये भाव मिळाला. हा दर समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मुहुर्तावर सौद्यासाठ गोदामातील बेदाणा शेतकऱ्यांनी बाजारात आणला होता.
सांगलीत हळदीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र यंदा हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नाही. नवा गूळ मात्र बाजारात येऊ लागला आहे. गुळाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.