शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:21 IST

राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा होते.

आटपाडी: महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व हे शरद पवारच आहेत हे वसंतदादांनी देखील ओळखलं होते. वसंतदादांनी शरद पवारांना प्रमोट केलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एक किस्सा सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आटपाडीत आयोजित शेतकरी अभ्यास मेळाव्यामध्ये ते बोलत होते.राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा होते. अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांच्यावर खापर फोडतात. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी त्याचं सरकार पाडलं, त्यांच्या पाठित खंजीर खुपसल्याची उदाहरण देतात. यावर जयंत पाटील यांनी वसंतदादा पाटलांनी शरद पवारांना प्रमोट केल्याचं सांगत गौप्यस्फोट केला.यावेळी जयंत पाटील यांनी एक किस्सा सांगितला, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आपले मोठे बंधू भगतसिंग पाटील हे एका कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी वसंतदादांनी शरद पवार हे महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणातील नेतृत्व असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांना वसंतदादांनीच एका अर्थाने प्रमोट केलं आणि त्यांच्या डोक्यात देखील महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शरद पवार हे एकमेव नेतृत्व असेल असं होतं",महाराष्ट्राचे पुढचे राजकारण करण्यासाठी शरद पवारच सक्षम आहेत. महाराष्ट्राची बहुजन समाजाची, ग्रामीण भागाची सर्व बाजूने काळजी घेणारे शरद पवारच असू शकतात. शरद पवारच भविष्यात पुढच्या पिढीला योग्यरित्या पुढे नेतील असा वसंतदादांना विश्वास होता असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारVasantdada Patilवसंतदादा पाटीलJayant Patilजयंत पाटील