वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:13 PM2022-10-28T13:13:06+5:302022-10-28T13:21:01+5:30

राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा होते.

It was Vasant Dada who promoted Sharad Pawar at that time, Jayant Patil sensational disclosure | वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा

वसंतदादांनीच त्याकाळी शरद पवारांना प्रमोट केले, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा; सांगितला किस्सा

Next

आटपाडी: महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व हे शरद पवारच आहेत हे वसंतदादांनी देखील ओळखलं होते. वसंतदादांनी शरद पवारांना प्रमोट केलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एक किस्सा सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आटपाडीत आयोजित शेतकरी अभ्यास मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा होते. अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांच्यावर खापर फोडतात. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी त्याचं सरकार पाडलं, त्यांच्या पाठित खंजीर खुपसल्याची उदाहरण देतात. यावर जयंत पाटील यांनी वसंतदादा पाटलांनी शरद पवारांना प्रमोट केल्याचं सांगत गौप्यस्फोट केला.

यावेळी जयंत पाटील यांनी एक किस्सा सांगितला, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आपले मोठे बंधू भगतसिंग पाटील हे एका कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी वसंतदादांनी शरद पवार हे महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणातील नेतृत्व असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांना वसंतदादांनीच एका अर्थाने प्रमोट केलं आणि त्यांच्या डोक्यात देखील महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शरद पवार हे एकमेव नेतृत्व असेल असं होतं",

महाराष्ट्राचे पुढचे राजकारण करण्यासाठी शरद पवारच सक्षम आहेत. महाराष्ट्राची बहुजन समाजाची, ग्रामीण भागाची सर्व बाजूने काळजी घेणारे शरद पवारच असू शकतात. शरद पवारच भविष्यात पुढच्या पिढीला योग्यरित्या पुढे नेतील असा वसंतदादांना विश्वास होता असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: It was Vasant Dada who promoted Sharad Pawar at that time, Jayant Patil sensational disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.