शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST

विकास आराखडा अंतिम टप्प्यात : इस्लामपूर पालिकेतील नगररचना विभागाचा भोंगळ कारभार

अशोक पाटील - इस्लामपूर  --इस्लामपूरचा नियोजित विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. याचाच फायदा घेऊन सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने बिल्डर, धनदांडग्यांना बेकायदेशीर बांधकामासाठी अभय दिले आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांतील काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील हजारो बेकायदेशीरपणे बांधकामांवर हातोडा मारणे हे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान असणार आहे.इस्लामपुरात १९८० नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम परवाना मिळवणे मोठे आव्हान ठरत आहे. नगरपालिकेच्या नगररचना विभागात सर्वसामान्यांना गुंठेवारी नियमितीकरण आणि बांधकाम परवान्यासाठी नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. तेथे एजंटांचा सुळसुळाट आहे. या एजंटांकरवीच गुंठेवारीत बांधकाम परवाना दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवाना न घेताच घर बांधणे पसंद करतात. सध्या शहरात हजारो बांधकामे झाली आहेत, तसेच नवीन सुरू आहेत. गुंठेवारी नियमित असलेल्या भूखंडावरही पालिकेचा परवाना न घेता बांधकामे करण्यात आली आहेत. अशा बांधकामांनाही नगररचना विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. अशी बांधकामे काढणे म्हणजे सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. शहरातील काही प्रभागातील रस्त्यांची शिल्लक असलेली जागाही भूखंड माफियांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते आणि गटारी करणे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. काहींनी रस्त्यावरच बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत. अशा मालमत्ताधारकांनाही प्रशासनाने अभय दिले आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे चित्र असल्याने बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय ठरणार आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाची बेकायदा बांधकामाबाबतची भूमिका येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.शहरातील बेकायदा बांधकाम हे सत्ताधाऱ्यांचे पाप आहे. गुंठेवारी नियमित करणे व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी नगररचना विभागाची पायरी चढणे सर्वसामान्यांना अशक्य आहे. याचाच परिणाम शहरातील विनापरवाना बांधकाम वाढण्यावर झाला आहे. शासन निर्णयानुसार त्यांच्यावर ठराविक दंडात्मक कारवाई करून बांधकाम कायम करावे.-विजय कुंभार, विरोधी पक्षनेते....जेथे नगराध्यक्षच कायदा मोडतातइस्लापूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी पूर्वी कागदपत्रांचा घोटाळा करून स्वत:चेच बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याची तक्रार माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. जेथे नगराध्यक्षच कायदा मोडून बांधकाम करतात, तर सर्वसामान्यांनी असे बांधकाम केले तर काय बिघडले, असा सवाल उपस्थित होत आहे.