शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

राजारामबापू कारखान्याची निवडणूक बिनविरोधकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 17:53 IST

संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक

इस्लामपूर : राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर एकूण ४९ अर्ज दाखल झाले आहेत. कुंडल गटातील एकमेव अर्ज वगळता उर्वरित सर्व अर्ज जयंत पाटील समर्थकांचे आहेत. आठ विद्यमान संचालकांना अर्धचंद्र मिळाला आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.येथील सहायक निबंधक कार्यालयात गुरुवारी अखेरच्या दिवशी रणजित खवरे (मालेवाडी), रणजित पाटील (कामेरी), युवराज पाटील, बाळूकाका पाटील (इस्लामपूर), भाऊसाहेब कदम (बोरगाव गट), रघुनाथ जाधव, बबन थोटे, रामचंद्र सिद्ध, आप्पासाहेब हाक्के, वैभव साळुंखे-पाटील (आष्टा गट), दीपक पाटील, प्रमोद गायकवाड, सर्जेराव भगत, सुरेश पाटील (कुरळप गट), जयंत पाटील, प्रतीक पाटील, देवराज पाटील, अजित पाटील, सतीश पाटील (पेठ गट), प्रकाश पवार, राजेंद्र पाटील (कुंडल गट) यांचे अर्ज आले, तर अशोक जाधव यांचा कुंडल गटातील एकमेव अर्ज  विरोधातील आहे.देवराज पाटील यांनी संस्था गटातूनही अर्ज भरला आहे. जालिंदर कांबळे, योजना सचिन शिंदे, उत्तम माळी, हणमंत माळी (इतर मागास प्रवर्ग) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व ४९ अर्जांची छाननी दि. २० रोजी शुक्रवारी होईल. त्यानंतर ६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.यांना मिळाला अर्धचंद्रकारखान्याच्या स्थापनेपासून ५३ वर्षे संचालकपद आणि २८ वर्षे अध्यक्षपद भूषविणारे पी. आर. पाटील (कुरळप), विराज शिंदे (आष्टा), दिलीपराव पाटील (येलूर), श्रेणिक कबाडे (कारंदवाडी), एल. बी. माळी (बागणी), भगवान पाटील (इस्लामपूर), प्रदीप थोरात (नरसिंहपूर), महिला संचालिका सुवर्णा पाटील (बहे) यांना यावेळच्या निवडणुकीत अर्धचंद्र मिळाला आहे.उमेदवारी अर्ज दाखल केलेले विद्यमान संचालकआमदार जयंत पाटील (कासेगाव), विजयराव पाटील (साखराळे), देवराज पाटील (कासेगाव), कार्तिक पाटील (बोरगाव), प्रकाशराव पवार (कुंडल), प्रदीपकुमार पाटील (शिगाव), विठ्ठल पाटील (बहे), माणिक शेळके (आष्टा), मेघा पाटील (शिगाव), जालिंदर कांबळे (इस्लामपूर).

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक