शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Sangli- काळाचा घाला,..अन् अवघ्या पंधरा दिवसांत संसार कायमचा संपला; नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:28 IST

आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिलेले. संसार काय असतो हे समजले पण नाही. हळद उतरली नाही तोच...

इस्लामपूर : कर्नाटकातील हल्लूर (ता. मुदलगी, जि. बेळगाव) येथे टँकर व कारच्या अपघातात इस्लामपुरातील नवदाम्पत्य ठार झाले. बदामीतील बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.इंद्रजित मोहन ढमणगे (वय २८) व कल्याणी ढमणगे (वय २६, दोघेही रा. किसाननगर इस्लामपूर, ता. वाळवा), अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इंद्रजित यांचे वडील मोहन व आई गंगव्वा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

इस्लामपूर येथील अभियंता इंद्रजित मोहन ढमणगे यांचा विवाह इचलकरंजी येथील प्रकाश उरणे यांची कन्या ॲड. कल्याणी यांच्याशी १८ मार्चला झाला होता. नवविवाहित जोडपे चारचाकीमधून शुक्रवारी ३१ मार्चला सकाळी इस्लामपूर येथून कर्नाटकातील बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मृत इंद्रजित यांचे आई- वडीलही सोबत होते.शनिवारी ढमणगे कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले. तेथून घरी परत येताना हल्लूर गावाजवळ एका टँकरने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात इंद्रजित आणि कल्याणी हे दाम्पत्य ठार झाले. इंद्रजितचे आई- वडील जखमी झाले. त्यांना इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अवघ्या पंधरा दिवसांत संसार उद्ध्वस्तअपघातामुळे ढमणगे व उरणे कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. लग्नानंतर अवघ्या पंधराव्या दिवशी नवदाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इस्लामपुरातील किसाननगर येथे व ढमणगे यांच्या मूळ घराच्या उरूण परिसरात शोककळा पसरली. मृत इंद्रजित हा मुंबईत एका कंपनीत संगणक अभियंता होता.बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणाराएकुलता एक मुलगा गेल्याने ढमणगे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रविवारी सकाळी मृतदेह आणल्यावर बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रविवारी सकाळी दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू