शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
2
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
3
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
4
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
5
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
6
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
7
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
8
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
9
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
10
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
11
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
12
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
13
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
14
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
15
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
16
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
17
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
18
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
19
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
20
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...

Sangli: इस्लामपूरचा नियोजित विकास आराखडा मंजूर; राजपत्र आल्यानंतरच बोलू - मुख्याधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:15 IST

इस्लामपूर : शहराचा नियोजित विकास आराखडा अखेर मंजूर झाला आहे. परंतु आराखड्यामधील सविस्तर माहिती सर्वसामान्यांना समजलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारक ...

इस्लामपूर : शहराचा नियोजित विकास आराखडा अखेर मंजूर झाला आहे. परंतु आराखड्यामधील सविस्तर माहिती सर्वसामान्यांना समजलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारक संभ्रमावस्थेत आहेत. पालिकेकडे अधिसूचना प्राप्त झाली असली तरी प्रारूप आराखड्याचे राजपत्र आल्यानंतरच बोलू, असे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.इस्लामपूर नगरपरिषद, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३१(१) अन्वये अंतिम मंजुरी मिळाली असून इस्लामपूर नगरपरिषदेच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना शासनाने मंजुरीतून वगळून कलम ३१(१) अन्वये प्रसिध्द केलेल्या सारभूत स्वरूपाच्या फेरबदलासह ईपी ६४, ईपीआर ७७, ईपीझेड ५ ला अंतिम मंजुरी दिली आहे.परंतु नगरपरिषदेने विविध विकासासाठी एसएम ५२ आरक्षणे, रस्त्यासाठी एसएमआर ८६, इतर विकासासाठी एसएमझेड ११ आरक्षणे शासन व पालिकेने अंतिम केली. तसेच ईपी ९६ मधील वगळलेली आरक्षणे शासनाने बाजूला काढली व त्यावर सुनावणी घेऊन ईपी ७९, ईपीआरसाठी १७ अशी एकूण २४५ विविध हेतूसाठी आरक्षणे प्रस्ताविक केली होती. त्याचा अंतिम मंजुरीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. शासनाच्या विकास आराखड्यामुळे मालमत्ताधारकांत संभ्रमावस्था आहे. परंतु काही भूखंड माफियांनी बेकायदेशीरपणे खरेदी-विक्रींचे व्यवहार केल्याने त्यांचे भूखंडावरील आरक्षण कायम राहिल्याची कुजबुज मालमत्ताधारकांत आहे. तर काही भूखंड माफियांनी पालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या भूखंडांची कागदपत्रे कायदेशीरपणे करण्यात यशस्वी झाली आहेत. नूतन विकास आराखडा योजनेत रस्ते, उद्याने, शॉपिंग सेंटर, खेळांची मैदाने, पार्किंग, ग्रंथालय, घरकूल योजना अशी विविध आरक्षणे कायम केली आहेत.

सन १९८० ची आरक्षणे अजूनही विकसित केलेली नाहीत आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर आरक्षणाचा नांगर फिरवला आहे. परंतु नगरपालिकेने शहरातील गुंठेवारी नियमितीकरण केलेल्या त्या सर्व मालमत्ता गावठाणमध्ये आल्याने सर्वसामान्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नगररचना अधिनियम १९६६ कलम १२७ अन्वये सदरची आरक्षणे १० वर्षांमध्ये विकसित केली गेली नाहीत तर ती आरक्षणे ती आरक्षणे वगळली जाणार आहेत. - विजय कुंभार, माजी विरोधी पक्षनेते, इस्लामपूर नगरपरिषद

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर