शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीवरून सावळागोंधळ

By admin | Updated: June 17, 2016 00:23 IST

सोयीसाठी पदाधिकारी आग्रही : नियमानुसारच बदल्या झाल्याचा सीईओंचा दावा

सांगली : आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांच्या बदलीवरून जिल्हा परिषदेत सुरू असलेला गोंधळ थांबण्याची चिन्हे नसून, या शिक्षकांची सोय कमी अन् गैरसोयच जास्त झाल्याच्या तक्रारी होत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या सोयींचा आग्रह सुरू असतानाच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बदलीची प्रक्रिया राबविली असून यात बदल करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.दरम्यान, शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीला झालेला विलंब, सीईटीतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देताना झालेली दिरंगाई व पदाधिकाऱ्यांत बदलीवरून असलेले मतभेद याचा फटका या शिक्षकांना बसला आहे. यामुळे शाळा सुरू झाल्या तरी अजूनही बदल्यांचा घोळ सुरूच असल्याचे चित्र आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून जिल्हा परिषदेकडे ७७ शिक्षक हजर झाले होते. मुख्याध्यापकांची पदोन्नती न झाल्याने रिक्त जागांवर पदस्थापना थांबली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया राबवित या शिक्षकांना बदलीचे आदेश जारी केले होते. मात्र, यात त्या शिक्षकांची सोय कमी आणि गैरसोयच अधिक झाल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, मुख्याध्यापकांना पदोन्नती देऊन अथवा रिक्त असलेल्या जागांवर नियुक्ती देण्यासंदर्भात शिक्षण विभागाला पुरेसा वेळ दिला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बदली प्रक्रिया राबविण्यात आली. बदली करत असताना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व इतर शिफारशींचा विचार करण्यात आलेला आहे. याबाबतचा आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करत बदल्या केल्या असल्याने, या बदल्यांचे आदेश रद्द करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठीच बदली प्रक्रिया शिक्षण विभाग व पदाधिकाऱ्यांना बदलीसाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, त्यांनी ती राबविल्याने आपल्या अधिकारात या बदल्या केल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ शाळांमध्ये तर शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकच नसल्याने या बदल्या करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीच ही प्रक्रिया राबविल्याचे सीईओ डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.