सांगली : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांत नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीकडून अशोक मासाळे यांना संधी दिल्याने शहर जिल्हा कार्यकारणीच्या ३५ पदाधिकार्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे रविवारी राजीनामे दिले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदावरून राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दिवगंत अजित पवार यांच्या मृत्यूचा काही जणांना धाक राहिला नसल्याने असे प्रकार होत आहेत. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवकपदासाठी शुक्रवारच्या महासभेत निवडी पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला स्वीकृतच्या दोन जागा होत्या. एका जागेसाठी स्नेहल सावंत यांना संधी देण्यात आली. तर दुसऱ्या जागेसाठी प्रदेश राष्ट्रवादीकडून दिगंबर जाधव यांचे नाव आले होते. मात्र ऐनवेळी अशोक मासाळे यांचे नाव महासभेत देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी परस्परच नाव बदलल्याचा आरोपही करण्यात आला. या कारभारामुळे संतप्त शहर जिल्हा कार्यकारिणीच्या ३५ पदाधिकार्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले.याबाबत शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे म्हणाले, दिवगंत अजित पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे काही लोक वागत आहेत. महापालिकेत मनमानी कारभार सुरू आहे. पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकार्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी सविस्तर बोलणार : बागवान
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पक्षाचे नगरसेवक व नेत्यांच्या विचारानुसार झाल्या आहेत. सध्या मी बाहेरगावी आहे. मंगळवारी सांगलीत परतरणार असून त्यादिवशी ‘स्वीकृत’च्या निवडीबाबत माध्यमांशी सविस्तर बोलणार आहे. तसेच प्रदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडे आपले म्हणणे मांडून अहवाल सादर करणार असल्याचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सांगितले.
Web Summary : Sangli NCP faces turmoil as 35 officials resign over dissatisfaction regarding nominated councilor selections. Internal disputes surface, with allegations of disregard for party directives after a councilor name was changed. Senior leaders will discuss the issue.
Web Summary : सांगली राकांपा में मनोनीत पार्षदों के चयन पर असंतोष के कारण 35 अधिकारियों ने इस्तीफा दिया। आंतरिक विवाद सतह पर, पार्षद का नाम बदलने के बाद पार्टी निर्देशों की अवहेलना के आरोप। वरिष्ठ नेता इस मुद्दे पर चर्चा करेंगे।