शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गांजाची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 19:36 IST

ओडीसा ‌‘कनेक्शन'ची शक्यता

तासगाव : ओडीसा या राज्यातून गांजाची तस्करी करून हा गांजा तासगाव तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 34 किलो 505 ग्रॅम गांजा, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल, एक चारचाकी गाडी असा 13 लाख 99 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील 4 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.ओडीसा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी व विक्री होत आहे. याप्रकरणी ठिकठिकाणी पोलीस कारवाई करत आहेत. कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्याकडून आपण हा गांजा ओडीसा राज्यातून आणत असल्याचे सांगण्यात येत आहे.या टोळीकडून तासगाव तालुक्यातही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनिय सुत्रांकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव - भिवघाट रोडवर बिरणवाडी फाट्याजवळ सापळा लावला. यावेळी मनोज संभाजी नागणे (वय 36, रा. महूद बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा रस्त्याकडेला मोटारसायकलवर पिशवित गांजा घेऊन थांबल्याचे दिसून आले. त्याच्याकडून 4 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.नागणे याच्याडून पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने आपल्या मित्राच्या घरी महूद बुद्रुक येथे 8 किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली. हा गांजाही पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर नागणे याने हा गांजा ज्ञानेश्वर महादेव काळे (रा. नरसिंगपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महूद बुद्रूक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड (रा. नरसिंगपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कबुली त्याने दिली.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज हद्दीत  लवंग याठिकाणी सापळा रचून वैष्णव लावंड व त्याचा साथीदार अजय हणमंत काळे व त्यांच्याकडील एम. एच. 01, सी. व्ही. 4418 ही चारचाकी गाडी जप्त केली. यावेळी वैष्णव लावंड याच्याकडे कमरेला लावलेले गावडी पिस्तूल तसेच गाडीतील 22 किलो 450 ग्रॅम गांजा जप्त केला.याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 34 किलो 505 ग्रॅम गांजा, दुचाकी, चारचाकी, गावडी पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे 13 लाख 99 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे सतिश माने, अमरसिंह सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव योगाश जाधव, कपिल खाडे, सुहास काबुगडे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली.

गांजा तस्करांच्या टोळीने केला पोलिसांचा पाठलागयाप्रकरणात गांजा तस्करांच्या टोळीचा तपास करण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक अकलूज हद्दीतील पंचविस चार लवंग याठिकाणी पोहोचले. याठिकाणी संशयितांवर कारवाई करुन त्यांना घेऊन येत असताना गांजा तस्करांच्या टोळीने तासगाव पोलिसांच्या पथकाचा पाठलाग केला, अशी धक्कादायक माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस