आटपाडी : आटपाडी सूतगिरणीत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून झालेल्या गैरव्यवहाराबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिली.गुरुवारी मुंबईत मंत्रालयामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या दालनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आटपाडी सूतगिरणीच्या गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार गोपिचंद पडळकर यांनी आटपाडीच्या सूतगिरणीची सांगली जिल्हा बॅँकेने केलेली विक्री ही बेकायदेशीर व त्यामध्ये झालेला गैरव्यवहाराची माहिती मंत्री संजय सावकरे यांना दिली.याचबरोबर सूतगिरणीच्या जमिनीची केलेली विक्री याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आटपाडी सूतगिरणीतील गैरव्यवहाराप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैणे, वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर, वस्त्रोद्योग सहायक आयुक्त तांत्रिक नीलेश तिखाडे, वस्त्रोद्योग कक्षाधिकारी तुषार शिंदे, महादेव पाटील उपस्थित होते.
आटपाडीच्या सूतगिरणीप्रश्नी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना, आमदार पडळकर यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:47 IST