बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने बुधगाव हायस्कूलमध्ये संस्था विलगीकरण केंद्र बुधवारी सुरू झाले. पहिल्या दिवशी चार रुग्ण दाखल झाले. त्यामध्ये दोन महिला, एक पुरुष व एका बालकाचा समावेश आहे. विलगीकरण केंद्रात या रुग्णांचे स्वागत आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरपंच सुरेश ओंकारे, सचिव तलाठी गणेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी केले.
बुधगावात दुसऱ्या लाटेत आजअखेर २८२ कोरोना रुग्ण आढळले असून, यापैकी ३९ गृहविलगीकरणात आहेत. आठ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सातजणांचा मृत्यू झाला आहे.
मागील दोन महिन्यांपासून बुधगावात विलगीकरण केंद्र सुरू करावे यासाठी वारंवार सूचना देत होते. अखेर बुधवारी बुधगाव हायस्कूलमध्ये हे केंद्र सुरू झाले.