मिरजेत शिवाजी स्टेडियम दुरुस्तीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:01+5:302021-03-19T04:26:01+5:30
मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीच्या कामाची महापालिका नगरअभियंत्यांनी पाहणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. मिरजेत छत्रपती ...

मिरजेत शिवाजी स्टेडियम दुरुस्तीची पाहणी
मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीच्या कामाची महापालिका नगरअभियंत्यांनी पाहणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून शहर अभियंता संजय देसाई यांनी कामाची पाहणी केली. चार कोटी रुपये निधीतून क्रीडांगण दुरुस्तीचे काम सुरू आहे. पॅव्हेलियनचे काम साठ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाबाबत खेळाडू व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी देसाई यांनी चर्चा केली. मैदानाच्या कामातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांनी ठेकेदारास दिल्या. गेली दीड वर्षे छत्रपती शिवाजी स्टेडियम दुरुस्तीचे काम सुरू आहे.
यावेळी नगरसेवक आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अतिष अग्रवाल, शब्बीर शेख, राजू कांबळे, मुन्ना नायकवडी, रमेश माने यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.