शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवरील अतिक्रमणांची तातडीने चौकशी करा

By admin | Updated: December 22, 2016 00:12 IST

पर्यावरण विभागाचे आदेश : प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सांगली : जुना बुधगाव रस्त्यावर नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांची तातडीने चौकशी करून पंधरा दिवसांच्या आत अहवाल पाठविण्याचे आदेश पर्यावरण विभागाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरातील अतिक्रमणविरोधी कृती समितीने यासंदर्भात पाठपुरावा केला होता. स्थानिक पातळीवर तक्रारीची दखल घेतली न गेल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पर्यावरण विभागाचे अवर सचिव का. सु. लंगोटे यांनी नुकतेच यासंदर्भात चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार असल्याने, याबाबतचा अहवाल तातडीने १५ दिवसांच्या आत सादर करावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. समितीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुना बुधगाव रस्त्याच्या पश्चिम व पूर्व बाजूस पूरपट्टा आहे. तसेच नैसर्गिक स्रोत व नाले अस्तित्वात आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम अगर जमिनींची खरेदी-विक्री करता येत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. एका व्यावसायिकाने सर्व्हे क्र. १२३ मधील नाला बुजविला असून, त्यावर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्यांची विक्रीही केली आहे. हरितपट्ट्यातील या जमिनींचे व्यवहार करून बांधकामासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिक फौजदारी कारवाईस पात्र आहे.नाल्यांवरील अतिक्रमणांविरोधात शासनस्तरावर समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष जयंत जाधव, अवधूत पळसे, सद्दाम खाटिक, नीलेश पाटील, मकरंद म्हामुलकर, शेखर पवार, योगेश जाधव, अमित देसाई, प्रवीण सावंत, वाजीद अपराध, महेश इंगवले, उत्कर्ष राजपूत, सागर लोहार यांनी पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)