जिल्ह्यात सराईत घरफोडी, दुचाकी चोरट्याला अटक; सात गुन्हे उघडकीस

By शरद जाधव | Updated: December 20, 2023 00:22 IST2023-12-20T00:22:23+5:302023-12-20T00:22:30+5:30

अडीच लाखांचा माल जप्त

Inn burglary in the district, two-wheeler thief arrested; Seven crimes were revealed | जिल्ह्यात सराईत घरफोडी, दुचाकी चोरट्याला अटक; सात गुन्हे उघडकीस

जिल्ह्यात सराईत घरफोडी, दुचाकी चोरट्याला अटक; सात गुन्हे उघडकीस

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरातील विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला सांगली शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. मोहंमद अब्दुलगनी शेख (वय २०, रा. अलअमीन शाळेजवळ, शामरावनगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख ५५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली शहरातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

शहरातील दुचाकी चोरीसह घरफोडी गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत होते. त्यानुसार पथकाला माहिती मिळाली की, संशयित शेख हा शहरातील शामरावनगर येथील झुलेलाल मंदिराजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी जवळील दुचाकी शंभरफुटी रस्त्यावरून चोरल्याचे सांगितले.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, गुंडोपंत दोरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

घरफोडीचेही गुन्हे उघडकीस

संशयित शेख याने चोरीची कबुली दिली. यात चार दुचाकी, घरफोडी व उघड्यावरील चोरी केल्या आहेत. त्याच्याकडून दोन लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Inn burglary in the district, two-wheeler thief arrested; Seven crimes were revealed