Injured after colliding with a motor pole | मोटार खांबावर आदळून जखमी

मोटार खांबावर आदळून जखमी

ठळक मुद्देमोटार खांबावर आदळून जखमीदुचाकी अपघातात तरुण जखमी

सांगली : भरघाव मोटार खांबावर आदळून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाले. गणेश सुखदेव गुंजे (वय ४२, रा. पुणे) असे जखमीचे नाव आहे. रविवार, दि. १९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्यासुमारास नांद्रे (ता. मिरज) येथे झाला. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दुचाकी अपघातात तरुण जखमी

सांगली : दुचाकी अपघातात तरुण जखमी झाला. सोहेल अख्तर ऐनापुरे (वय २२, रा. विश्रामबाग, सांगली) असे जखमीचे नाव आहे. रविवार, दि. १९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्यासुमारास ही घटना घडली. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मारहाणीत दोघे जखमी

सांगली : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. विजय नाना कांबळे (वय ६०, रा. बांबवडे, ता. पलूस ), पूनम सतीश खाडे (३०, रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दुचाकी धडकेत एक जखमी

सांगली : दोन दुचाकींच्या घडकेत एकजण जखमी झाले. संदीप शिवाजी जाघव (वय ३६, रा. चिंचणी, ता. तासगाव) असे जखमीचे नाव आहे. शनिवार दि. १० रोजी रात्री साडेसात वाजण्याच्यासुमारास ही घटना घडली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मणेराजुरीत तरुणास विषबाधा

सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे तरुणास विषबाधा झाली. अभिजित दशरथ पवार (वय २३) असे त्याचे नाव आहे. शनिवार, दि. १० रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्यासुमारास घरी ही घटना घडली. अत्यवस्थ अवस्थेत त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुचाकीवरून पडून महिला जखमी

सांगली : दुचाकीवरून पडून महिला जखमी झाली. जहेरा रफिक शेख (वय ४०, रा. मिरज) असे जखमीचे नाव आहे. रविवार, दि. ११ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास म्हैसाळ रस्त्यावर हा अपघात झाला. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गरम पाणी भाजून बालक जखमी

सांगली : गरम पाणी भाजल्याने बालक जखमी झाला. चिंटू हणमंत बजंत्री (वय ४, रा. रावळगुंडवाडी, ता. जत) असे जखमीचे नाव्र आहे. रविवार, दि. ११९ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्यासुमारास घरी ही घटना घडली. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात. आले.

बुलेटची बॅटरी, इंडिकेटर लंपास

सांगली : हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वुलेटची बॅटरी, इंडिकेटर चोरट्याने लंपास केली. शुक्रवार, दि. ९ राजी ही घटना घडली. याप्रकरणी सौरभ सुभाष वैद्य (वय ३४, रा. झुलेलाल चौक, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Injured after colliding with a motor pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.