शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 10:57 IST

धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गंगाराम पाटीलवारणावती : चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात १८०८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज, मंगळवारी सकाळी धरणातून ५६२८ क्युसेकने वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३० एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी मुळे पाणलोट क्षेत्रात १८०८१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आज, सकाळी धरणाचे वक्राकार दरवाजातून ४००० क्युसेक विसर्ग व जलविद्युत केंद्राकडून १६२८ असा एकूण ५६२८ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जावून वाहतूक बंद झाली आहे तर शित्तूर आरळा पुलाच्या कठड्याना घासून पाणी जात आहे. चरण सोंडोली पुला जवळील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.धरणातील पाणीसाठा ३०.०८ झाला असून त्याची टक्केवारी ८४.४४ अशी आहे. पाणी पातळी ६२२.७५ मीटर झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १३० मिलीमीटर सह एकूण १५८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण