शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:15 IST

‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप

सांगली : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, रूपाली चाकणकर यांनी दबाव आणून फिर्याद मागे घ्यायला लावली. त्यानंतर पुन्हा सामूहिक अत्याचार झाला. माझ्या शरीराचे किती लचके तोडले जाणार? असा सवाल पीडित तरुणीने सांगलीत पत्रकार बैठकीत बुधवारी केला. दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्याकडे न्यायाची मागणी केल्यानंतर त्यांनी ‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोपही पीडितेने केला.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत ही पत्रकार बैठक झाली. पीडित तरुणी म्हणाली, २०२० मध्ये कडेगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन अत्याचार केला. या प्रकरणात राज्यभर आंदोलन सुरू झाले.तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली. मी नकार दिल्यानंतर मला त्यांच्या पीएमार्फत दीड कोटींची ऑफर दिली गेली. त्यानंतर तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगलीत हॉटेलमध्ये चार दिवस नजरकैदेत ठेवले. त्यानंतर सतत दबाव टाकून गुन्हा मागे घ्यायला लावला.पीडिता म्हणाली, पोलिस अधिकारी हसबनीस याने अत्याचारानंतर पुन्हा मला त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्यावर पुन्हा सामूहिक अत्याचार झाला. तत्कालीन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी माझी तक्रार ऐकून घेत गुन्हा नोंदविला. मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे हसबनीस आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मागे घ्यायला लावलेली केस पुन्हा ओपन करावी. माझ्यावरील अत्याचाराचे, दबावाचे पुरावे घेऊन मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे.

या आरोपात काहीही तथ्य नाही. संबंधित महिला २०२० रोजी बलात्कार झाल्याचे सांगत असेल तर त्यावेळी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नव्हते. माझी महिला आयोगाची नियुक्ती २० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली आहे. - रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीRupali Chakankarरुपाली चाकणकरAnil Deshmukhअनिल देशमुख