शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधी खर्च करण्यात गाडगीळ, जयंत पाटीलच भारी, सर्वात कमी खर्च करणाऱ्या आमदार कोण? जाणून घ्या

By अविनाश कोळी | Updated: March 1, 2023 11:56 IST

खानापूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार फंडातून मंजूर कामांची संख्या कमी

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यात आमदार फंडातून कामे करण्याबाबत सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व इस्लामपूरचे आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आघाडीवर असून, फेब्रुवारीपर्यंतच त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. खानापूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार फंडातून मंजूर कामांची संख्या कमी आहे.आमदार फंडातील मंजूर निधी हा प्रत्येक आर्थिक वर्षात खर्च करावा लागतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आमदार फंड खर्च करण्यासाठी आता केवळ महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे आमदारांची कामे मंजूर करून ती मार्गी लावण्याची लगबग सुरू आहे. काही आमदारांनी मात्र ९० टक्के निधी खर्च केला आहे. महिन्यात उर्वरित १० टक्के निधी खर्च होऊन अतिरिक्त प्रस्ताव त्यांच्याकडून सादर होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी काही आमदारांकडून मंजूर निधीपेक्षा जास्त प्रस्ताव दिले जातात. पुढील वर्षात त्या कामांचा समावेश करून ते निधीचा विनियोग करतात. काही आमदारांना मंजूर निधी खर्च करता येत नाही. तरीही राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील बहुतांश आमदारांकडून फंडाचा विनियोग गतीने केला जात आहे. यंदा काही आमदार याबाबत मागे पडलेले दिसतात. रस्ते, गटारी, समाजमंदिरे अशा कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

आमदार निधीतून ही कामे करता येतातपायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्यांमधील रस्ते, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा, मंडयांची दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे फंडातून करता येतात.

वर्षाला पाच कोटींचा निधी मिळतो२०११-१२ मध्ये आमदार निधी दीड कोटींवरून दोन कोटी केला होता. त्यानंतर दहा वर्षे निधीत वाढ नव्हती. २०२०-२१ मध्ये तीन कोटी, २०२१-२२ मध्ये चार आणि आता २०२२-२३ मध्ये पाच कोटी आमदारांना मिळाले.

सर्वाधिक निधी सुधीर गाडगीळांनी खर्च केलाआठ विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक निधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी खर्च केला.गाडगीळ यांचा फेब्रुवारीमध्येच मंजूर ४ कोटी ९० लाखांपैकी ३ कोटी ९६ लाख खर्च झाले आहेत.मार्चअखेर संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न आहेत.

सर्वात कमी निधीचा खर्च सुमनताईंकडूनजिल्ह्यात सर्वात कमी निधी खर्च तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून झाला. त्यांनी आजपर्यंत २ कोटी २७ लाख रुपये खर्च केले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMLAआमदारJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस