शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बेकायदा गर्भपातप्रकरण : कोल्हापुरातील संशयितांची नावे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 2:16 PM

सांगली येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देबेकायदा गर्भपातप्रकरण : कोल्हापुरातील संशयितांची नावे निष्पन्नगर्भपाताची किटस् देणाऱ्याचा सुगावा; रुग्णालयांच्या तपासणीसाठी टास्क फोर्स

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. गर्भपाताची किटस् देणाऱ्याचा सुगावा लागला आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी टास्क फोर्स पथक तयार करुन रुग्णालयांची नियमीत तपासणी केली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.ते म्हणाले, चौगुले हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेले गर्भपात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याच्या तपासाचा मी स्वत: दररोज आढावा घेत आहे. वैद्यकीय पथकाची मदत घेऊन तपास केला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. या हॉस्पिटलला गर्भपात करण्याचा परवाना नाही. तरीही याठिकाणी सांगलीकोल्हापूरातील काही डॉक्टर महिला रुग्णांना पाठवित होते. पोलिसांच्या छाप्यात गर्भपाताची पंधरा किटस् सापडली होती.

ही किटस्, औषधे व इंजक्शनचा साठा त्यांना कोण पुरवत होते? याबद्दल चौकशी केली जात आहे. काही जणांची नावे पुढे आली आहेत. डॉ. रुपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले हे मुख्य संशयित आहेत. यामध्ये आणखी काही जणांना अटक होऊ शकते. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.ते म्हणाले, गर्भपात केलेल्या सर्वच महिलांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यातील कोल्हापुरातील एक महिला गर्भपात करण्यासाठी कोल्हापुरच्या रुग्णालयात गेली होती. पण तेथील डॉक्टरने गर्भपात करण्यास नकार दिला. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्याला समजली. त्याने या महिलेस गाठून सांगलीतील चौगुले हॉस्पिटलचा पत्ता देऊन तिथे जाण्याचा सल्ला दिला. यासाठी त्याने पैसेही घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कर्मचाऱ्यांस चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. संशयिताविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले जातील. तपासात दरम्यान आणखी भ्रूण हत्येची आणखी काही प्रकरणे उघडकीस आल्यास संशयितावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले जातील. गर्भपात करण्यामागील मुख्य कारणाचाही शोध घेतला जात आहे. वंशाला मुलगाच हवा, ही समाजाची मानसिकता आणि विचार बदलले तरच अशा गुन्ह्यांना आळा बसणार आहे.गणेशोत्सवानंतर पथकशर्मा म्हणाले, म्हैसाळनंतर सांगलीत गर्भपाताचे प्रकरण उजेडात आले. या घटनांना आळा घालण्यासाठी गणेशोत्सव झाल्यानंतर महापालिका, महसूल व पोलीस विभागाची संयुक्तपणे बैठक घेतली जाईल. या बैठकीत टास्क फोर्स पथक तयार केले जाईल. पथकामार्फत विशेषत: मॅटर्निटी रुग्णालयांची नियमित तपासणी जाईल. नागरिकांनीही काही माहिती मिळाल्यास ती संबंधित विभागाला देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीkolhapurकोल्हापूर