शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: भाजपसोबत युती न झाल्यास महायुतीला फटका बसेल - शंभुराजे देसाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:21 IST

शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत महायुतीसाठी आमचे प्रयत्न आहेत. पालकमंत्र्यांंशी चर्चा सुरू आहेत. दोन दिवसांत बैठक होईल, जागा वाटपात भाजपने मान-सन्मान दिला तर घेऊ, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविणार आहोत. भाजपने शिवसेनेबरोबर युती न केल्यास महायुतीलाच फटका बसेल, असे पर्यटनराज्यमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई सांगलीत आले होते. त्यांनी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीसाठी आमचा प्रयत्न आहे. भाजपबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे. पुढील चर्चा येत्या काही दिवसांत होईल. याची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्यावर दिली आहे.

महायुतीमध्ये शिवसेनेला योग्य वाटा मिळायला हवा. भाजपने मान-सन्मान दिला तर महायुती होईल, अन्यथा शिवसेनेकडे १७५ जण इच्छुक आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. इच्छुकांना प्रथम पक्षाचे काम, चिन्ह जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना दिल्या आहेत, असा देसाई यांनी स्पष्ट केले.

चव्हाण मंत्री असताना वायूदलाचा पराभव झाला असेल?ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यावर देसाई म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी घटना ते केंद्रात मंत्री होते, त्या वेळची सांगितली असेल, पण सध्या झालेले ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीचे नुकसान नाहीखासदार संजय राऊत आता बरे होऊन घरी आले आहेत. ते पुन्हा काही तरी बरळू लागले आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला नुकसान नसल्याचेही देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Alliance with BJP crucial for Mahayuti, says Shambhuraje Desai.

Web Summary : Minister Shambhuraje Desai emphasizes BJP alliance for Sangli Municipal elections. He warns Mahayuti could suffer if BJP doesn't partner. Desai also dismisses claims about an Indian Air Force defeat and downplays the impact of Thackeray brothers uniting on Mahayuti prospects.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv Senaशिवसेना