शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

सांगली पोलीस दलात २५ स्कॉर्पिओ जीप, ५० मोटरसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:25 IST

Police Sangli Bike jayantpatil-पोलीसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास व चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधा पुरविल्यास पोलीस दल अधिक कार्यक्षमतेने काम करेल: जयंत पाटीलसांगली पोलीस दलात २५ स्कॉर्पिओ जीप, ५० मोटरसायकल

सांगली :पोलीसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास व चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

लॉकडाऊन काळात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीसांनी अत्यंत चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून पोलीस काम करत असतात. संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. कोरोना काळापासून पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे.जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीमधून पोलीस दलाने २५ स्कॉर्पिओ जीप तसेच ५० मोटरसायकल खरेदी केल्या. या वाहनांचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पोलीस मुख्यालय सांगली येथील मैदानावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरूण लाड, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे आदि उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधीतून पोलीसांची गरज लक्षात घेऊन २५ स्कॉर्पिओ जीप तसेच ५० मोटरसायकल पुरविल्या आहेत. पोलीसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना विविध अत्याधुनिक सुविधा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याबाबतही सतर्क असणे आवश्यक आहे. पोलीसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास त्यांना चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील. इस्लामपूर व विटा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यास चांगली मदत होणार आहे.

पुढील काळात इतर शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा मानस व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सीसीटीव्हींची संख्या वाढविणे आवश्यक असून पोलीसांची नजर नाही असा एकही शहराचा कोपरा राहू नये अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस दलाने आधुनिकीकरणाकडे पाऊल टाकले आहे. पोलीस दलासाठी जे आवश्यक आहे त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू.

विविध सोयी सुविधांच्या माध्यमातून पोलीस चुकीच्या व्यवसाय / प्रवृत्तीवर अंकूश ठेवून अधिक कार्यक्षमतेने काम करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांगली शहरातील प्रत्येक बीटवर गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक संबंधित भागातील नागरिकांना द्यावा. त्यामुळे नागरिकांना तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधता येईल व पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचतील. असे झाल्यास पोलीसांची वचकही निर्माण होईल, असे ते म्हणाले.सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदमम्हणाले, पोलीस दलासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. अत्याधुनिक वाहनाबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लोकांचे संरक्षण करण्यासाठी चांगली मदत होणार आहे. पुढील काळात आणखी जुनी वाहने बदलण्यासाठी प्रयत्नशील राहू. पोलीसांच्यावर शारिरीक तसेच मानसिक ताण असतो. त्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे असून त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी भारती विद्यापीठ पुढाकार घेईल, असे ते म्हणाले.आमदार अनिल बाबर म्हणाले, पोलीस दलास आधुनिकतेची गरज अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांचे नियंत्रण राहून त्यांची कार्यक्षमता वाढेल त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गुणवत्ता वाढेली अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका हद्दीत सांगली व मिरज शहरात गतवर्षीच सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आता इस्लामपूर व विटा शहरातही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पुढील काळातही ज्या शहरामध्ये सीसीटीव्ही बसवायचे आहेत त्यासाठी सन 2021-22 साठी जिल्हा नियोजन मध्ये आवश्यक निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याचा पोलीस दलाला चांगला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. नविन पुरविण्यात आलेल्या वाहनांमुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी नविन वाहने तसेच इस्लामपूर व विटा शहरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोर्कापण याबाबत सविस्तर माहिती देवून पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी स्कॉर्पिओ वाहन चावी, हेल्मेट व बॉडी कॅमेरा प्रदान, पोलीस पाल्यांना खाजगी उद्योजकांकडील नियुक्ती पत्र व उद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन करून हिरवा झेंडा दाखवून वाहन संचलन करण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालय येथील सीसीटीव्ही कंट्रोल रूमला भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी मान्यवरांनी केली.या कार्यक्रमास पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी मानले.

टॅग्स :PoliceपोलिसbikeबाईकSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील