शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मी शरद पवार यांच्यासोबतच, पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:55 IST

निवडणुकीच्या तयारीला लागावे..

सांगली : मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी पक्ष सोडणार असल्याच्या कोणत्याही बातम्या किंवा अफवावर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी पक्ष सोडून अन्यत्र जाणार, या अफवा आहेत. पण मी कोठेही जाणार नाही. शरद पवार साहेबांसोबतच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष मजबुतीसाठी जोमाने आणि कोणतीही शंका मनात न ठेवता काम करावे. मी कोठेही जाणार नाही. पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर मी नाही.कार्यकर्त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागावे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम किंवा अन्य कारणाबाबत पक्षातर्फे आंदोलने केली जातील. या माध्यमातून लोकांपर्यंत संपर्क वाढवा, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे मांडली. तसेच ईव्हीएम, लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे प्रचार व जातीयवादी प्रचारचा महायुतीला फायदा झाल्याचे कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले. बैठकीला शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, अभिजित हारगे, राहुल पवार, मैनूद्दीन बागवान, युवराज गायकवाड, पवित्रा केरीपाळे, मिरजेतील पराभूत उमदेवार तानाजी सातपुते आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तयारीला लागावे..जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेत ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात घेतली. यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचा संदेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार