शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

कौटुंबिक हिंसाचारातून पत्नीनं साथीदाराच्या मदतीनं केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:05 IST

शिरसी येथे अमावस्येच्या रात्री झालेल्या कृष्णात तुकाराम शिंदे ( वय 47 वर्ष ) यांच्या हत्येचा उलघडा करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या पत्नीने साथीदाराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला असून प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले. 

सांगली : शिरसी येथे अमावस्येच्या रात्री झालेल्या कृष्णात तुकाराम शिंदे ( वय 47 वर्ष ) यांच्या हत्येचा उलघडा करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या पत्नीने साथीदाराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला असून प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले. याप्रकरणी कृष्णात यांची पत्नी उज्ज्वला शिंदे (वय 27 वर्ष) हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. शिरसीतील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभा-यात शुक्रवारी मध्यरात्री अमावास्येला कृष्णात शिंदे यांची हत्या करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मृतदेहाजवळ हळद-कुंकू, टाचण्या व पूजेचे साहित्य पडले होते. यावरुन हा नरबळी असावा, असा संशय होता. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 

अखेर चार दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवित त्यांच्या कुटुंबापासून चौकशीला सुरूवात केली. अखेर या हत्येत कृष्णात यांच्या पत्नी उज्ज्वला हिला ताब्यात घेण्यात आले.  याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख शिंदे म्हणाले की, मृतदेहाची ओळख पटविणे व खूनाच्या कारणांचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. पण पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून खूनाचा उलघडा केला आहे. कृष्णात यांच्या पत्नीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला. या खूनामागे कौटुंबिक हिंसाचाराचे कारण प्राथमिक तपासास समोर आले आहे. कृष्णात हा पत्नी उज्ज्वला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांत सतत भांडण होत असे. गणेशोत्सवापासून ती माहेरी भिलवडी (तालुका पलूस) येथे रहात होती. या छळाला कंटाळून तिने एका साथीदाराच्या मदतीने कृष्णात याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. खूनापूर्वी महिनाभर तिची तयारी सुरू होती. १६ नोव्हेंबर रोजी उज्ज्वला व तिच्या साथीदारात चर्चा झाली. दुस-यादिवशी १७ रोजी दुपारी कृष्णात याला अंकलखोप येथे बोलावून घेण्यात आले. तिथे उज्ज्वला व तिच्या साथीदाराने त्यांना दोघांत भांडणे होतात, ते थांबविण्यासाठी देवाला जाऊ, असे सांगून कृष्णात याला मोटारसायकलीवरून शिरसीत आणण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारात चक्रभैरव मंदिरात त्यांच्या डोक्यात दगड, विट घालून खून करण्यात आला. याप्रकरणी चौकशीतून साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.  नरबळीचा प्रकार नाही : शिंदेअमावस्येच्या रात्री मंदिरात अनोळखी व्यक्ती खून करण्यात आला. मृतदेहाशेजारी लिंबू, कुंकु व इतर साहित्य असल्याने नरबळीचा संशय व्यक्त होत होता. पोलिसांनी ती शक्यता गृहीत धरून तपास केला. शिरसी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली. मंदिराचे बांधकाम केलेल्या दत्ता माळी यांच्याशी चर्चा झाली. चक्रभैरव मंदिरातील भैरवनाथ हे महादेवाचा अवतार असल्याचे गावकरी मानतात. मंदिरात गोड नैवैद्य असतो. श्रावण महिन्यात भैरवनाथाची पालखीही निघते. आजूबाजूच्या आठ ते दहा गावातील लोक दर्शनासाठी येतात. या मंदिरात पशुंची बळी देण्याची प्रथा नाही. त्यातूनच नरबळीचा हा प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता खूनाचा उलघडाही झाला असून हा खून कौटूंबिक हिंसाचारातून झाल्याचे उघड झाले आहे, असे जिल्हा पोलिस प्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले.  बस तिकिटामुळे ओळख पटलीमृत कृष्णात यांच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोपपर्यंतचे एसटी बसचे तिकीट सापडले होते. या तिकीटावरून मृत व्यक्ती पाचवा मैल, पलूस परिसरातील असावा, अशी शक्यता गृहित धरून तपास सुरू केला. अखेर मृत व्यक्ती कुंडल येथील असल्याचे उघड होऊन ओळख पटली.  पथकाला बक्षीसशिरसी येथील मंदिरात झालेल्या खूनाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी माहिती देणा-यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पण पोलिस उपअधिक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खूनाचा उलघडा केल्याने आता हे बक्षीस पोलिस पथकाला दिले जाईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा