नांद्रेत पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला

By शरद जाधव | Updated: February 25, 2023 21:45 IST2023-02-25T21:43:56+5:302023-02-25T21:45:09+5:30

संशयिताने कृष्णाबाई यांच्या दोन्ही हातावर, पाठीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केले आहे.

husband attacked wife with coyote in nandre sangli | नांद्रेत पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला

नांद्रेत पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, शरद जाधव, सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी कृष्णाबाई लिंगाप्पा सावळगी (रा. हारोली प्लॉट, नांद्रे) यांनी लिंगाप्पा ब्रम्हाप्पा सावळगी याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवार, दि. २४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्नाटकातील तिकोटा येथील सावळगी कुटुंब मजुरीच्या निमित्ताने नांद्रेत राहण्यास आले आहे. सावळगी यांना चार मुली असून, संशयित लिंगाप्पा हा काम जिथे असेल तिथेच राहत असे किंवा रत्नापूर (कर्नाटक) येथे त्याची बहीण असल्याने तो तिथेही राहण्यास आहे. शुक्रवारी पहाटे तो नांद्रेत घरी आला व त्याने कृष्णाबाई यांच्यावर हल्ला केला. हल्ला करत असतानाच त्यांच्या मुली निकिता व रेखा या भांडण सोडविण्यास मध्ये आल्या असता, त्यांनाही जखम झाली. 

संशयिताने कृष्णाबाई यांच्या दोन्ही हातावर, पाठीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: husband attacked wife with coyote in nandre sangli