तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

By श्रीनिवास नागे | Updated: March 1, 2023 16:02 IST2023-03-01T16:02:12+5:302023-03-01T16:02:34+5:30

सांगली : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तासगाव (जि. सांगली ) येथे बुधवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात नऊ ...

Hundreds of hands collected nine tons of garbage in Tasgaon, an initiative of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

सांगली : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तासगाव (जि. सांगली) येथे बुधवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात नऊ टन कचरा गोळा करण्यात आला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तहसील कार्यालय व एसटी आगार परिसरातील स्वच्छता करण्यात आली. आसपासच्या गावातील दोनशेहून अधिक सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. तीन तास चाललेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये तब्बल नऊ टन कचरा संकलित करण्यात आला.

तहसील कार्यालयाचा परिसर पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या, काटेरी झाडे-झुडपे, वाळलेले गवत यापासून मुक्त करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या महास्वच्छता अभियानामध्ये तहसीलदार रवींद्र रांजणे, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तसेच महसूल, पालिका कर्मचारी, वनविभाग अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Hundreds of hands collected nine tons of garbage in Tasgaon, an initiative of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan

टॅग्स :Sangliसांगली