शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:56 IST

संबंधित धाब्याची पूर्वतयारी म्हणून रेकीही करण्यात आली होती

मिरज : मिरज- म्हैसाळ रस्त्यावरील ‘हॉटेल टर्निंग पॉइंट’ येथे कोयता व विळ्याचा धाक दाखवत हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून १२ हजार रुपये रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, मित्राच्या दुचाकीचा फायनान्सचा हप्ता भरण्यासाठी चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत प्रथमेश राजेंद्र पाटील (वय २६, व्यवसाय- हॉटेल, रा. सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जबरी चोरीप्रकरणी दाऊद नईम सलाती (वय २०, रा. गुरुवार पेठ, मिरज), आयान फारुक जमादार (वय २०, रा. गुरुवार पेठ, मिरज), अकीबअली अकबरअली पठाण (वय २०, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज) व सलीम अब्दुल भोकरे (वय २१, रा. बोलवाड रोड, मिरज) या चौघांना अटक करण्यात आली आहे.ही घटना दि.४ रोजी रात्री ११:०० वाजता घडली. आरोपी आयान जमादार व अकीबअली पठाण यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील यांचे वडील दिवसभराचा हिशोब करीत असताना आरोपींनी त्यांना विळ्याने मारहाण केली व जबरदस्तीने १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम घेऊन पळ काढला.तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात वापरलेला कोयता, विळा व दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.अटक करण्यात आलेले चौघे अभियांत्रिकी, बीसीए, डीएमएलटी व बारावीचे शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी असून, मित्राच्या दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी शहराबाहेरील धाब्यावर लूटमार करण्याचा कट रचला होता. यासाठी संबंधित धाब्याची पूर्वतयारी म्हणून रेकीही करण्यात आली होती. पुढील तपास मिरज शहर पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Students Rob Hotel for Friend's Bike Installment; Arrested

Web Summary : Four college students robbed a hotel in Miraj to pay a friend's bike installment. They attacked the owner's father, stealing ₹12,000. Police arrested them within 24 hours, recovering weapons and bikes. The students planned the robbery after surveying the hotel.