शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:32 IST

अमेरिकेतील बिझनेस इनसाइट या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१७ ते २०१९ या वर्षातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची उलाढाल काहीशी स्थिर होती.

अविनाश कोळी

सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची (इम्युन हेल्थ सप्लिमेंटस्) जगभरात ११.६ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. औषध उद्योगातील विविध संस्थांच्या अंदाजानुसार २०२१ मध्येही यात आणखी १० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेतील बिझनेस इनसाइट या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१७ ते २०१९ या वर्षातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची उलाढाल काहीशी स्थिर होती. २०२० मध्ये त्यात अचानक ११.६ टक्के वाढ झाली. २०२१ मध्ये यात आणखी १० टक्के वाढ होऊ शकते. २०२० मध्ये जागतिक स्तरावर १८.२२ बिलियन डॉलरची म्हणजेच १ लाख ३४ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. २०२१ मध्ये हीच उलाढाल २०.१८ बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. २०२८ पर्यंत या औषधांची बाजारपेठ ३१.५० बिलियन डॉलरची होईल, असा अंदाज आहे.

भारत, चीनसह आशियाई कंपन्यांचा या औषध उद्योगातील वाटा अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. सध्या या औषधांच्या एकूण उलाढालीतील उत्तर अमेरिकेतील औषध कंपन्यांचा वाटा ६५.८ टक्के आहे. कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी अनेक औषधी बाजारात आली. ज्यात ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे. जगातील अनेक नामांकित औषध कंपन्यांना कोरोना काळातील गरज ओळखून नवी रोगप्रतिकारक औषधी बाजारात आणली. 

कोराेनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अशा औषधांचे भारतातील उत्पादन व त्यांची निर्यात वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय औषधांनी जागतिक स्तरावर अधिक विश्वासार्हता मिळविल्याने त्याचे चांगले परिणाम दिसतील.- महेश दोशी, अध्यक्ष, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली