इस्लामपुरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:45+5:302021-06-28T04:18:45+5:30
इस्लामपूर येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रोझा किणीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी छाया शिरोले, योगिता माळी, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, ...

इस्लामपुरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
इस्लामपूर येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रोझा किणीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी छाया शिरोले, योगिता माळी, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, पुष्पलता खरात, साजिया किणीकर उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर व त्यांच्या सहकारी महिलांनी घंटागाडीतून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना, त्यांना जीवनावश्यक किट्सही भेट दिले. या अनपेक्षित सन्मानाने स्वच्छता कर्मचारी भारावून गेले. त्यांनी पुष्पगुच्छ व किट्स स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त केली.
रोझा किणीकर यांच्या घरासमोर संभाजी चौक ते आझाद चौक या परिसरातील कचरा गोळा करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा सन्मान करण्यात आला. शहर महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना जीवनावश्यक किटस भेट देण्यात आले. कोरोनाच्या काळातही इतरांपेक्षा अधिक जोखमीचे म्हणजे कचरा उचलण्याचे काम हे कर्मचारी करतात. ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ना जिवाची पर्वा, ना आरोग्याची चिंता असे काम करूनही उपेक्षित जीवन जगणाऱ्या ह्या लोकांचा आपण गौरव करणे आपले कर्तव्य असल्याची भावना किणीकर यांनी व्यक्त केली.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या छाया शिरोले, योगिता माळी, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, पुष्पलता खरात, साजिया किणीकर उपस्थित होत्या.