इस्लामपुरात सर्पमित्र युनूस मणेर यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:41+5:302021-08-18T04:31:41+5:30
इस्लामपूर येथे जायंटस्च्यावतीने सर्पमित्र युनूस मणेर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनीता सपकाळ, दुष्यंत राजमाने, डॉ. नितीन पाटील, भूषण ...

इस्लामपुरात सर्पमित्र युनूस मणेर यांचा सन्मान
इस्लामपूर येथे जायंटस्च्यावतीने सर्पमित्र युनूस मणेर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनीता सपकाळ, दुष्यंत राजमाने, डॉ. नितीन पाटील, भूषण शहा, राजू ओसवाल, श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील जायंटस् ग्रुप आणि सहेली जायंटस्च्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून विविध वन्यप्राण्यांचे प्राण वाचवितानाच त्यांच्या संवर्धन करणाऱ्या सर्पमित्र युनूस मणेर यांना जैवविविधता संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील जायंटस्च्या सभागृहात सहेली अध्यक्षा व पालिकेच्या बांधकाम सभापती सुनीता सपकाळ व जायंटसचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. १९९१ पासून मणेर हे वन्यप्राण्यांचे जीव वाचवून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देत. त्यांना जीवदान देत आले आहेत. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊन जायंटस् ग्रुपने मणेर यांना पुरस्कार दिला.
यावेळी माजी फेडरेशन अध्यक्ष डॉ. नितीन पाटील, फेडरेशनचे संचालक भूषण शहा, राजू ओसवाल, श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होत्या. सहेलीच्या उपाध्यक्षा चारुशीला फल्ले यांनी आभार मानले.