होलार समाज समन्वय समिती बिनविरोध, हातीकर, हेगडे, ऐवळे, करडे यांच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:50 IST2021-03-16T17:44:16+5:302021-03-16T17:50:11+5:30
Social Sangli- होलार समाज समन्व समितीच्या सांगली महीला जिल्हा शहर अध्यक्षपदी रुपाली हातीकर, जिल्हा शहर अध्यक्षपदी दिपक हेगडे,जिल्हा शहर उपाध्यक्षपदी दगडु ऐवळे, तर जिल्हा शहर सरचिटणीसपदी सिद्धेश्वर करडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

सांगलीत होलार समाज समन्वय समितीच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यावेळी राजाराम ऐवळे, रुपाली हत्तीकर, आनंद ऐवळे, राजु ऐवळे, दिपक हेंगडे, दगडू ऐवळे आदी उपस्थित होते. (छाया : सुरेंद्र दुपटे)
संजय नगर/सांगली : होलार समाज समन्व समितीच्या सांगली महीला जिल्हा शहर अध्यक्षपदी रुपाली हातीकर, जिल्हा शहर अध्यक्षपदी दिपक हेगडे,जिल्हा शहर उपाध्यक्षपदी दगडु ऐवळे, तर जिल्हा शहर सरचिटणीसपदी सिद्धेश्वर करडे यांच्या निवडी करण्यात आल्या.
संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी राजाराम ऐवळे, जिल्हा अध्यक्ष आनंद ऐवळे, दत्ताभाऊ गेजगे, आणाभाऊ साठे महामंडळ जिल्हा व्यवस्थापक सिद्राम जावीर, जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर केंगार, राजूदादा गेजगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेश भजनावळे, सनी कांबळे, सागर वाघमारे, शंकर कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदाराव ऐवळे यांनी केले, तर राजूदादा गेजगे यांनी आभार मानले.