बोरगावात कोरोना रुग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:43+5:302021-06-28T04:19:43+5:30

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) परिसरात रविवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. त्यांतील ७१ रुग्ण एकट्या बोरगावमध्ये ...

The highest number of corona patients in Borgaon | बोरगावात कोरोना रुग्णांचा उच्चांक

बोरगावात कोरोना रुग्णांचा उच्चांक

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) परिसरात रविवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. त्यांतील ७१ रुग्ण एकट्या बोरगावमध्ये सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोरगावमधील शिवाजीनगर भागात रविवारी आरोग्य विभागाने २०० नागरिकांची काेराेना तपासणी केली. यात तब्बल ६४ रुग्ण बाधित आढळले. याशिवाय गावात आणखी सात रुग्ण आढळून आले. याचबरोबर नवेखेड उपकेंद्रात २, मसुचीवाडी उपकेंद्रात १, साखराळे उपकेंद्रात १, फार्णेवाडी उपकेंद्रात ५, असे एकूण ८० नवीन काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले. ‌बोरगाव व परिसरातील गावांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. यासाठी नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. नियमांचे काटेकाेर पालन हाेत नाही.

आरोग्य विभागाने घरोघरी तपासणी केली नसती तर ही गंभीर बाब बनली असती. या ६४ रुग्णांमध्ये अनेक रुग्ण रोजंदारी करणारे आहेत. रोज ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मजुरी करतात. यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे बाधित झाली असती. नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The highest number of corona patients in Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.