शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिराळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदेसेनेत हायव्होल्टेज सामना, नगराध्यक्षपदासाठी 'काका-पुतण्या' लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:06 IST

प्रचारातील कळीचे मुद्दे असे...

विकास शहाशिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज माघारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर आता नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदासाठी चक्क काका-पुतण्यामध्येच प्रमुख लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथे झालेल्या युतीमुळे सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका-टिप्पणी सुरू आहे.अर्ज माघारी घेण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ नेत्यांची धावपळ, आश्वासने आणि मनधरणीला मोठे यश आले असून, अनेक उमेदवारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. यामुळे आता लढत थेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप- शिंदेसेना अशी दुरंगी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव सेनेचे अस्तित्व या निवडणुकीत दिसत नाही. येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेतेमंडळींनी वाऱ्यावर सोडले आहे.

वाचा: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी निवडणुकीतील प्रमुख हायलाईट्सकाका-पुतण्या आमने - सामने : नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अभिजित नाईक आणि भाजप-शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक या ''काका-पुतण्या'' अशी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.दिग्गजांची प्रतिष्ठा पणालामाजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक, सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.भाजप-शिंदेसेनेकडून माेर्चेबांधणीखासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, ॲड. भगतसिंग नाईक, हणमंतराव पाटील, प्रतापराव यादव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.वरिष्ठ नेत्यांची धावपळमुंबईतून युतीबाबतचे निर्णय झाल्याने स्थानिक नेत्यांवर मोठी जबाबदारी असून, सभा घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ आहे.

प्रचारातील कळीचे मुद्दे असे...या निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासाचे मुद्दे गाजणार आहेत. नागपंचमी उत्सव आणि परंपरा तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शहरातील रखडलेली विकासकामे आणि ती कोणी रोखली, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: High-voltage battle in Shirala, uncle vs. nephew for president.

Web Summary : Shirala witnesses a fierce Nagar Panchayat election with uncle vs. nephew for president. NCP vs. BJP-Shinde Sena face-off. Development issues dominate campaign.