शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Sangli: उच्चांकी पावसाचं गाव 'पाथरपुंज' पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, गावात मूलभूत सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:44 IST

देशातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकले आणि त्याची जागा पाथरपुंजने घेतली

विकास शहाशिराळा : सन २०१९ ला पाथरपुंज हे गाव अचानक चर्चेत आले. देशातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकले आणि त्याची जागा पाथरपुंजने घेतली. सर्वाधिक पावसाच्या या गावातील लोकांचे जीवनमान मात्र कष्टाने भरलेले आहे. गावात जायला पक्का रस्ता नाही, मोबाइलला रेंज नाही, ना दवाखाना, ना वीज असे अनेक प्रश्न असल्याने तेथील गावकरी कित्येक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) हे कोयना विभागाच्या दक्षिण टोकावर चांदोली अभयारण्यात येणारे गाव आहे. अवघी ५६ घरे व ३५० लोकसंख्या, कोणतीही सुविधा नाही, ना मोबाइल, ना फोन, ना बँक, ना बचतगट, ना कोणती सुविधा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बफर झोनमध्ये असणारे हे गाव अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. पाटण तालुक्यात हे गाव येत असले, तरी सातारा, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर ते वसले आहे. या गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर हे गाव वसले असले, तरी याठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी चांदोली धरणात जात असल्याने हे धरण भरते.वारणा खोऱ्यातील निवळी, धनगरवाडा व पाथरपुंज ही तीन रेनगेज स्टेशन येतात. त्यातील निवळी व पाथरपुंज येेथील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. त्यातील निवळी व पाथरपुंज याठिकाणी पडणारा पाऊस महत्त्वाचा आहे. मेघालयमधील चेरापुंजी इथं सरासरी तब्बल ८००० मिलिमीटर पाऊस पडतो. पण २०१९ मध्ये या भागात पाऊस कमी पडला. चेरापुंजीत ६ हजार ८२ इतका तर पाथरपुंज येथे ९ हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे पाथरपुंज नाव पुढे आले. सर्वांत जास्त पर्जन्यमान असलेला भाग म्हणून कायमचं कोरलं. पाथरपुंज येथे हे पहिल्यांदाच घडलं आहे, याचं कारण आहे पश्चिम बंगाल, ओडिशा भागातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकल्यामुळे महाबळेश्वर आणि आसपासच्या भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे, असा त्यावेळी निष्कर्ष काढला होता.

 यामुळे पडतो सर्वाधिक पाऊसपाथरपुंजमध्ये असणारी सह्याद्रीच्या कड्याची सलग रांग व हे उंच ठिकाण आहे. घनदाट जंगल, येथील कडा (दरी) काटकोनात आहेत. त्यामुळे मान्सूनचे ढग कोणत्याही दिशेने आले तरी त्या ढगांना अडविण्याची योग्य जागा असल्याची माहिती जल विज्ञान व जल हवामान विभागाकडून देण्यात आली.

पावसाळ्यात सर्व रस्ते बंदपाथरपुंज येथे जाण्यासाठी दळणवळणाचा रस्ता खडतर आहे. ठराविक चारचाकी गाडी कसरत करत जाऊ शकते. अन्यथा पंधरा-सोळा किलोमीटर चालत यायचे. पावसाळ्यात नाले, ओढे प्रवाहित झाले की सर्वच रस्ते बंद, गावातून बाहेरही पडू शकत नाही.पाथरपुंजमध्ये ५ ऑगस्ट २०१९ ला ४३० मिलिमीटर हा सर्वांत जास्त पाऊस पडला.एका वर्षात पडलेला पाच हजार मिलिमीटरपेक्षा जास्त एकूण पाऊस२०१९-२०  - ९९५६२०२०-२१ - ६४३३२०२१-२२  - ७०२३२०२२-२३ - ६९६८२०२३-२४  - ५७२६

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरRainपाऊसpatan-acपाटण