शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, गारपिटीचाही फटका; द्राक्षबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:04 IST

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी ...

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावात गारपीट झाली असून शिराळा, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील काही गावात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने द्राक्ष व बेदाणा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तसेच, आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे.सांगली जिल्ह्यात मंगळवारी दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे ३७ अंशांवर पारा गेला होता. मंगळवारी दुपारनंतर वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त होते. दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पलूस, शिराळा, तासगाव व कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सरी बरसल्या. खानापूर तालुक्यातील विटा परिसरात उन्हाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला, तरी काही भागांत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी सायंकाळीही मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचा अंदाज आहे. तासगाव तालुक्यात मणेराजुरी व विसापूर येथे जोरदार गारपीट झाली. उर्वरित तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील चरण परिसरात चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडला. पलूस तालुक्यातील दुधोंडी आणि घोगाव, दह्यारी, तुपारी, नागराळे, पुणदी परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सांगली, मिरज शहरात ढगांची दाटीसांगली, मिरज शहरात मंगळवारी सायंकाळी पाचनंतर ढगांची दाटी झाली होती. शहर व परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. दिवसभर शहरात तीव्र उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले होते.

तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांची धांदलपावसामुळे मंगळवारी सायंकाळी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारले आहेत. अवकाळी पावसाचे संकट वाढवल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु होती.

रात्रीचा उकाडा वाढलाजिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशांवर गेले असताना किमान तापमानाचा आलेखही वाढत आहे. मंगळवारी किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने रात्रीचा उकाडाही वाढला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी