शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

जिल्ह्यात सर्वत्र धुवाँधार पाऊस, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 2:20 PM

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेकठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून काहीठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यात सर्वत्र धुवाँधार पाऊस, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी पूल पाण्याखाली; छोट्या नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले

सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेकठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून काहीठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. इस्लामपूरमध्ये चोवीस तासात ११० मिलिमीटर तर सांगलीत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्हीठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

शिराळा, पलूस, कडेगाव व मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेकठिकाणी नद्या, नाल्यांवरील रस्ते पाण्याखाली गेले. नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी रातोरात मोठ्या प्रमाणात वाढली. सांगली, मिरज शहरे जलमय झाली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान २८ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. नदीपातळीतही वाढ होत असून सांगलीतील पाणीपातळी सध्या ७ फुटांवर गेली आहे.धरणांमधील साठ्यात मोठी वाढचोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्यामुळे एकूण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. कोयना धरणात चोवीस तासात २.९६ टी.एम.सी.ने तर वारणा धरणात १.५१ टी.एम.सी. पाणीसाठा वाढला. कोयना धरण क्षेत्रात १९२ मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात ९७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे.पावसाचे जिल्ह्यातील चित्र

  • सांगली, मिरज शहरे जलमय झाली
  • शिराळा तालुक्यात येळापूर ते समतानगर मार्गावरील पूल बुधवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला
  • कडेगाव तालुक्यात चिंचणी तलावात पाणी वाढल्याने येथील एक आपत्कालिन दरवाजा उघडण्यात आला.
  • वाळवा तालुक्यात वाटेगाव येथील भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ
  • वाळवा तालुक्यातील तिळगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.
  • आटपाडी व जत तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे.

जिल्ह्यातील पाऊस मि.मी.(चोवीस तासातील नोंद)

  • सांगली ८१.८
  • मिरज ५१.५
  • तासगाव ४४
  • कवठेमहांकाळ १५.८
  • शिराळा ६४.५
  • कडेगाव ५९.८
  • पलूस ५३.५
  • विटा २६.५
  • आटपाडी ७.८
  • जत ३.२
टॅग्स :Rainपाऊसislampur-acइस्लामपूरSangliसांगली