शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पाथरपुंजमध्ये किती मिमी झाली नोंद.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:18 IST

वळीव पावसाच्या दमदार हजेरीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले

शिराळा : शिराळा तालुक्यात सलग चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गेले अनेक महिने कोरडे पडलेले ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. चांदोली पाणलोट क्षेत्रात पाथरपुंज येथे १०६ मिमी व निवले येथे १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.शिराळ्यात बुधवारी व गुरुवारी कोकरूड परिसरात अतिवृष्टी झाली होती. शुक्रवारी दिवसभर पावसाने सुरुवात केली असून, सायंकाळी पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यात सर्वत्र या पावसाने सुरुवात केल्याने पेरणी पूर्व मशागत चांगल्या होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव झाली. शिराळ्यात अनेक ठिकाणी नाल्यांतील पाणी रस्त्यावर वाहत आहे. चरण येथे कोकरूड-चांदोली या मुख्य रस्त्यावर असणारे झाड पावसामुळे झुकल्याने मोठी वाहने जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. ते झाड काढण्यात आले आहे. खुजगाव येथे शेतातील बांध फुटून माती व मुरूम कोकरूड-शेडगेवाडी या मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. जेसीबीच्या साहाय्याने मुरूम-माती बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. तालुक्यातील पाझर तलावातील पाणीपातळीत वाढ होत आहे. सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने चांदोली धरणातील कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. या धरणातून नदीपात्रात ७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मंडलनिहाय पडलेला पाऊस. (कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये)

  • कोकरूड ३०.८०(१६८.३०)
  • शिराळा ३१ (१८४.१०)
  • शिरशी २२ (१३४.२०)
  • मांगले ३१.५०(१४६.४०)
  • सागाव ३१.३०(१२६.००)
  • चरण ३५.३०(१०५.५०)

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस व एकूण पाऊस

  • चांदोली धरण - ४७ (४०८१)
  • पाथरपुंज १०६(८४८०)
  • निवले १०५(६७९०)
  • चांदोली ५२(४०७५)
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरण