शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळ चेकपोस्टवर १६ लाखांचा गुटखा जप्त, एकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:44 IST

सुशांत घोरपडे  म्हैसाळ : मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई ...

सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत १६ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख (वय २८)रा.सांगली याला मिरज ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था रहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केले आहेत. आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक (MH 10 CR 0641) गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरज कडे येत होती. यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती. यावेळी पोलीस नाईक प्रविण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा सापडला. स्थिर सव्हक्षण पथकाचे पथकप्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, राँकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस