शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गुंड मध्या वाघमोडेचा कुंभारीत हवेत गोळीबार, दगडफेक करीत टोळीचा चौघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:58 IST

तेरा वर्षांपूर्वी पाेलिसांवर गाेळीबार

जत : माेक्काच्या कारवाईतील गुंड मध्या वाघमोडे याने कुंभारी (ता. जत) येथे हवेत गोळीबार करत धुडगूस घातला. त्याच्या टाेळीने दगडफेक करीत चाैघांवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री सात वाजता घडली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.मध्या वाघमोडे याच्यासह चाैघे रात्री कुंभारी येथे आले हाेते. बसस्थानकाजवळ असलेल्या एका पानटपरीवर त्याचा काहीजणांशी वाद झाला. यावेळी त्याने एकावर पिस्तूल रोखले. त्यानंतर हवेत गोळीबार केला. तेथून निघून जाताना त्याच्या टाेळीने समोर जो दिसेल त्याच्यावर दगडफेक करीत दहशत माजविली. दगडफेकीत चाैघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत तपासाला गती दिली. रात्री उशिरापर्यंत मध्यासह टाेळीचा शाेध सुरू हाेता.

ग्रामस्थांचे रास्ता राेकाे आंदाेलनअचानक घडलेल्या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या टोळीस त्वरित पकडण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदाेलन केले. यामुळे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेआठ नंतर वाहतूक सुरळीत झाली.

तेरा वर्षांपूर्वी पाेलिसांवर गाेळीबारतेरा वर्षांपूर्वी मध्या वाघमोडेने पकडण्यास आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या मांडीत गोळी घुसली होती. त्यानंतर मध्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. २०१६ मध्ये त्याच्या मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली हाेती. मोक्कामधून सहा महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

टॅग्स :SangliसांगलीFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस