शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कडेगाव तहसीलवर मराठा मोर्चाचा झेंडा आंदोलकांचा गनिमीकावा : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, दगडफेकीचा प्रकार; विजापूर-गुहागर महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:07 IST

येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. या

कडेगाव : येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे आंदोलकांनी फोडले. आंदोलकांनी विजापूर-गुहागर महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरला.

शुक्रवारी सकाळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे दगडाने फोडले. आंदोलकांचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याऱ्या पोलीस कर्मचाºयास दगड मारण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा व फलक झळकविला.

यानंतर संतप्त आंदोलकांनी कडेगाव बसस्थानकाजवळ विजापूर-गुहागर महामार्गाकडे मोर्चा वळविला. रस्त्यावर टायर पेटवून तब्बल तीन तास रास्ता रोको केला. पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक बोलाविले. त्यानंतर तर आंदोलक जास्तच संतप्त झाले. आंदोलकांनी दंगल नियंत्रण पथकाच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक माघारी पाठविले. दरम्यान, तहसीलदार अर्चना शेटे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. तेव्हा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख रास्ता रोको आंदोलनस्थळी आले. त्यावेळी संतप्त आंदोलकांनी त्यांना निवेदन देण्यास नकार दिला. मात्र काही वेळानंतर त्यांच्याकडे पुन्हा निवेदन दिले.प्रांताधिकाºयांना धक्काबुक्कीचा प्रयत्नकडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख निवेदन स्वीकारण्यासाठी बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलनस्थळी आले, त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्याकडे निवेदन देण्यास नकार दिला. आंदोलकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत काही आंदोलकांनी प्रांताधिकाºयांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्चा समितीने त्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर तासाभराने प्रांताधिकाºयांना बोलावून निवेदन सादर केले. यावेळी प्रांताधिकाºयांनी ठिय्या आंदोलनस्थळी निवेदन न स्वीकारल्याची चूक मान्य केली.सरकार व मराठा आमदारांचा निषेधमराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या मराठा आमदारांचे आंदोलकांनी अभिनंदन केले. मराठा असूनही मूग गिळून गप्प बसलेल्या राज्यातील अन्य मराठा आमदारांचा आंदोलकांनी निषेध केला. यावेळी आरक्षणाबाबत वेळकाढू धोरण राबविणाºया सरकारचाही आंदोलकांनी निषेध केला.चिंचणीत कडकडीत बंदसकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी चिंचणी (ता. कडेगाव) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. चिंचणी येथील सर्व दुकाने व बाजारपेठ दिवसभर बंद होती. येथील व्यापारी व दुकानदारांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दिला.

टॅग्स :Sangliसांगलीmarathaमराठा