सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:03 IST2019-08-16T11:43:12+5:302019-08-16T12:03:35+5:30

सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमिवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

Guardian Minister Subhash Deshmukh visits flood-hit Miraj village | सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट

सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट

ठळक मुद्देसुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेटडॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित

सांगली : सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमिवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हरिपूर, ढवळी आणि वड्डी भागातील काही ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. पूरबाधितांना सानुग्रह अनुदान आणि धान्य वाटप करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पूरबाधितांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन पूरबाधितांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 

Web Title: Guardian Minister Subhash Deshmukh visits flood-hit Miraj village