शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’च्या कर्जाला संचालकांची हमी

By admin | Updated: August 31, 2015 21:47 IST

जिल्हा बँक : ३५ कोटींच्या नुकसानीचा संचालकांवर ठपका--जिल्हा बँक गैरव्यवहार-२

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला प्रशासकीय मान्यता न घेताच कर्जवाटप केल्याची बाब आरोपपत्रात आली आहे. यातील एका कर्ज प्रकरणासाठी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी वैयक्तिक व सामुदायिक हमी दिली असल्याने हे कर्ज प्रकरण संचालकांच्यादृष्टीने अधिक अडचणीचे ठरणार आहे. कारखान्याच्या कर्ज वाटपात बँकेला एकूण ३५ कोटी ६ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्यास ३१ डिसेंबर २00५ रोजी संचालक मंडळाच्या सभेत मालताबेगहाण म्हणून १५ कोटी रुपये व १ कोटी नजरगहाण कर्ज मंजूर करण्यात आले. त्यासाठी कारखान्याची जमीन, कारखाना इमारत, प्रशासकीय इमारत, साखर गोदाम, कर्मचारी वसाहत, विश्रामगृह, कामगार भवन, मोलॅसिस टँक, शुगर हाऊस, पंप हाऊस, बॉयलर हाऊस आदी स्थावर व यंत्रसामग्री तारण घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे कारखान्याच्या सर्व संचालकांनी या कर्जासाठी वैयक्तिक व सामुदायिक हमी घेतलेली आहे. हे कर्ज देताना मंजुरी पत्रातील कोणत्याही अटींची पूर्तता केली नाही. या कर्जास साखर आयुक्तांच्या मान्यतेची गरज असताना, त्यांच्या मान्यतेचा विचार केला गेला नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जादा रकमेची कर्जे कारखान्याला उभारता येत नाहीत. असे असताना जादाचा कर्ज पुरवठा करण्यात आला. तसेच कारखान्याचे नेटवर्थ व एन.डी.आर. उणे होती. कर्जमर्यादाही संपण्याबरोबरचअपुरा दुरावाही निर्माण झाला होता. बँकेच्या कार्यकारी समितीनेही १७ फेब्रुवारी २00४ रोजी २८ कोटी ३ लाख २९ हजार रुपयांचे खेळते भांडवली मध्यम मुदत रुपांतर कर्ज मंजूर केले. या कर्जास शासनाने ४१ कोटी ६ लाख ८२ हजार रुपयांची विनाअट थकहमी दिली आहे. या कर्ज मंजुरीलाही साखर आयुक्तांची परवानगी नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कारखान्याला कर्ज उभारता येत नसताना, या कर्जाचा पुरवठा झाला. त्यापूर्वी २५ आॅगस्ट १९९९ रोजी कार्यकारी समितीनेच ९७ लाख ७४ हजार रुपयांचे मध्यम मुदत (यंत्रसामग्री) कर्ज मंजूर केले होते. या तिन्ही कर्जांबाबत वसुलीसाठी बँकेने मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र कारखान्याच्या विक्रीचा निर्णय प्रशासकांच्या कालावधित झाला. कारखान्याची ५६ कोटी ५१ लाख रुपयांना विक्री करण्यात आली. सध्या कारखान्याकडून तिन्ही कर्जापोटी ३५ कोटी ६ लाख ६ हजार रुपये येणे आहेत. या नुकसानीला व त्यावरील व्याजाला तत्कालीन संचालक, यांना जबाबदार धरले आहे. (प्रतिनिधी)हे दिग्गज अडचणीतआ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी मंत्री मदन पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, विजयकुमार सगरे, लालासाहेब यादव, डी. के. पाटील, अमरसिंह नाईक, विद्यमान संचालक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, प्रा. सिकंदर जमादार यांचा याप्रकरणी समावेश आहे.