सांगलीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:58 IST2020-06-27T16:56:50+5:302020-06-27T16:58:28+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.

Greetings to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj | सांगलीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सांगलीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

ठळक मुद्देराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन सांगली समाज कल्याण कार्यालयाच्या आवारात सामाजिक न्याय दिन

सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.

 सध्या कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे आज दि. 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली या कार्यालयाच्या आवारात साजरा करण्यात आला.

यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, विशेष अधिकारी सचिन काळे, तसेच कार्यालयातील व विविध महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj