राष्ट्रवादीतर्फे सांगलीत महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:19 IST2019-01-30T16:12:34+5:302019-01-30T16:19:35+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधींंच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात महात्मा गांधींंच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली .

Greetings to Mahatma Gandhi in Sangli by NCP | राष्ट्रवादीतर्फे सांगलीत महात्मा गांधींना अभिवादन

राष्ट्रवादीतर्फे सांगलीत महात्मा गांधींना अभिवादन

ठळक मुद्देराष्ट्रवादीतर्फे सांगलीत महात्मा गांधींना अभिवादनजॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

सांगली : राष्ट्रपिता महात्मा गांधींंच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात महात्मा गांधींंच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली .

भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी, माजी शिक्षण सभापती पद्माकर जगदाळे, सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, महिला अध्यक्षा विनया पाठक, उत्तम कांबळे ,माजी स्थायी समिती सभापती हरिदास पाटील,माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे, नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका स्वाती पारधी, प्रभाग ३ च्या सभापती रईसा रंगरेज, नगरसेवक आयुब बारगीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahatma Gandhi in Sangli by NCP