शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत जादा परताव्याच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:09 IST

मिरज : मिरजेत जादा परताव्याच्या आमिषाने शासकीय कर्मचाऱ्याची ३० लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात ...

मिरज : मिरजेत जादा परताव्याच्या आमिषाने शासकीय कर्मचाऱ्याची ३० लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन कल्लापा येडुरे व अक्षता नितीन येडुरे (दोघेही रा. बुधवार पेठ, मिरज) यांनी त्यांच्या सानवी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी एलएलपी या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चार टक्के दराने अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून जावेद हारुण शेख (वय ३८), रा. सांगली या पाटबंधारे कर्मचाऱ्याची ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शेख यांनी मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत शहर पोलिसात २ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येडूरे दाम्पत्याने अशा प्रकारे अनेकजणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षेबाबत नवीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जादा अधिकार असून, महसूल विभागाला फसवणुकीच्या रकमेच्या वसुलीचे अधिकार आहेत.मिरज-सांगली परिसरांत ज्यांची या दाम्पत्याने फसवणूक केली आहे, अशांनी संपर्क साधण्याचे आवाहन मिरज शहर पोलिसांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस