शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सोने-चांदी गलाई व्यावसायिक तरुणाचा भोकसून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:38 IST

उत्तर प्रदेशमधील सोने-चांदी गलाई दुकानातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणातून गलाई व्यावसायिक महादेव रघुनाथ माळी (वय २९, रा. माळी मळा, देविखिंडी रोड, माधळमुठी) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला.

ठळक मुद्देसोने-चांदी गलाई व्यावसायिक तरुणाचा भोकसून खूनसंशयित तरुणास अटक

विटा : उत्तर प्रदेशमधील सोने-चांदी गलाई दुकानातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणातून गलाई व्यावसायिक महादेव रघुनाथ माळी (वय २९, रा. माळी मळा, देविखिंडी रोड, माधळमुठी) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला.

ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माधळमुठी (ता. खानापूर) येथे घडली. याप्रकरणी संशयित विश्वास ऊर्फ राहुल किसन माळी (२४, रा. माधळमुठी) या गलाई व्यावसायिक तरुणाला विटा पोलिसांनी अटक केली आहे.

माधळमुठी येथील महादेव माळी व संशयित विश्वास ऊर्फ राहुल माळी या दोघांचा उत्तर प्रदेशमधील सुजानगंज येथे भागीदारीत सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. हे दोघेही एकाच भावकीतील आहेत. मात्र व्यवसायातून दोघांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने हे दोघेही गावी माधळमुठी येथे आले होते. शनिवारी रात्री महादेव यांनी भागीदारी व्यवसायातील पैसे व दुकानातील साहित्य राहुल यास परत मागितले. त्यावेळी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास राहुल माळी याने महादेव यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी वाद घातला.

या वादात राहुल याने महादेव यांना त्यांच्या घरातून बाहेर ओढून त्यांच्या छातीवर व पोटावर शस्त्राने हल्ला केला. यात महादेव गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर राहुलने घटनास्थळावरून पलायन केले.पोलिसांनी शोधमोहीम हाती घेऊन रात्री उशिरा संशयित राहुल माळी यास लेंगरे (ता. खानापूर) येथे अटक केली. याप्रकरणी मृत महादेव यांची पत्नी राजाक्का माळी यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीPoliceपोलिस