'समाजाच्या लोकसंख्येनुसार राजकीय, नोकरी अन् शैक्षणिक आरक्षण मिळावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:15 PM2018-10-16T18:15:08+5:302018-10-16T18:16:05+5:30

'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही.

'Get political, job and educational reservation as per the population of the society', Hardik patel demand | 'समाजाच्या लोकसंख्येनुसार राजकीय, नोकरी अन् शैक्षणिक आरक्षण मिळावे'

'समाजाच्या लोकसंख्येनुसार राजकीय, नोकरी अन् शैक्षणिक आरक्षण मिळावे'

Next

सांगली - पाटीदार समजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर आगपाखड केली. तसेच समाजाच्या लोकसंख्येवर आधारीत आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी हार्दिक पटेल यांनी केली. लोकसंख्येनुसार राजकारण, नोकरी आणि शिक्षणातआरक्षण द्यावे. त्या, त्या समाजातील परिश्रम घेणारांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे, असे पटेल यांनी  म्हटले. सांगली येथे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी ते आले होते. त्यावेळी, त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलून धरला.

'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नसून आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही,' असे हार्दिक पटेल यांनी म्हटले. पटेल म्हणाले, 'गुजरातमध्ये हिंदी भाषिकांबरोबर गैरवर्तन केले जात नाही. कारण, गुजरातमध्ये सर्वत्र हिंदी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात धनगर, मराठा समाजातील लोक आपल्या प्रतिनिधित्वासाठी लढत आहेत. सर्वांची जबाबदारी आहे की सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारावा. कारण, आपण सर्वांनी मते दिलेली आहेत.' असा आक्रमक पवित्रा हार्दिक यांच्या भाषणात दिसून आला. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचेही हार्दीक यांनी म्हटले.
 

Web Title: 'Get political, job and educational reservation as per the population of the society', Hardik patel demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.