बालविकास मंचच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री, अमित, इंद्रजितचे यश
By Admin | Updated: July 31, 2014 00:19 IST2014-07-31T00:16:56+5:302014-07-31T00:19:15+5:30
निकाल जाहीर : सांगलीत आयोजन, तीन गटांमध्ये स्पर्धा

बालविकास मंचच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री, अमित, इंद्रजितचे यश
सांगली : बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सांगलीत परीक्षकांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. एसएफसी मेगा मॉलमध्ये दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते नववी या तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
दुसरी ते चौथी या गटासाठी ‘माझं आवडतं कार्टून’, ‘आवडता प्राणी किंवा पक्षी’, ‘बेनिफीट आॅफ होमवर्क’, ‘एज्युकेशन इज इम्पॉर्टंट’ या विषयावर, तर पाचवी ते सातवी गटासाठी ‘सुनीता विल्यम्स’, ‘भारतीय परंपरा’, ‘आई’, ‘माझा आदर्श’, आणि आठवी, नववीसाठी ‘डॉ. अब्दुल कलाम’, ‘माझे स्वप्न’, ‘पर्यावरण रक्षणाची गरज’, ‘प्रगत तंत्रज्ञान’ या विषयांवर सदस्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून पटवर्धन हायस्कूलमधील राहुल संबोधी व द इंग्लिश क्लबचे संचालक जयंत नागराळे यांनी काम पाहिले.
निकाल पुढीलप्रमाणे : दुसरी ते चौथी : गायत्री पाटील (प्रथम), मल्हार पाटील (द्वितीय), अक्षरा खैरे (तृतीय), अभिजित विभुते (उत्तेजनार्थ).
पाचवी ते सातवी : अमित लाळगे (प्रथम), ओंकार जाधव (द्वितीय), संकेत मोरे (तृतीय), श्रद्धा तोडकर, स्वरांजली झांबरे, साक्षी यळगुडे, स्वप्ना अडसट्टी, प्रणव पोळ, सानिका खोत, निधी कुलकर्णी, प्रतीक्षा पाटील, सायली चौगुले, प्रज्ञा माळकर (उत्तेजनार्थ).
आठवी ते नववी : इंद्रजित मोरे (प्रथम), वैभव माने (द्वितीय), विश्वजित लोहार (तृतीय), प्रथमेश पाटील, प्रीती खाडे, प्राजक्ता चौगुले, श्रेया चौगुले, मनीषा घोडके (उत्तेजनार्थ). (प्रतिनिधी)