बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video
By अविनाश कोळी | Updated: September 11, 2023 15:45 IST2023-09-11T13:31:26+5:302023-09-11T15:45:37+5:30
..अन् पुन्हा तिने नाचण्यास केली सुरुवात; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली, काहींनी दिली दाद

बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video
सांगली : डान्स व अदाकारीमुळे तरुणांच्यात लोकप्रिय झालेली नृत्यांगनागौतमी पाटील सध्या तिच्या नृत्यामुळे नव्हे तर स्टेजवर पडल्यामुळे सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. पलूस येथे रंगलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात रविवारी रात्री बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली. तिच्या सुरक्षारक्षकांनी तिला उचलले अन् पुन्हा तिने नाचण्यास सुरुवात केली.
पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटील रविवारी आली होती. स्टेजवर आल्यानंतर साऱ्या प्रेक्षकांना तिने हात उंचावत अभिवादन केले. लाल साडीत आलेल्या गौतमीने गाण्यावर ताल धरला. स्टेजवर तिचे नृत्य बहरल्यानंतर अचानक तिचा पाय घसरला. ती खाली कोसळली. तिला उठता येत नव्हते. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी तिला हात देत उचलले.
त्यानंतर पुन्हा तिने ताल धरत नृत्य सुरु केले. प्रेक्षकांनी त्यानंतर टाळ्या, शिट्यांचा गजर केला. नेहमी तिच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतो. चाहत्यांनी ती स्टेजवर पडल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल केला. त्यावर अनेकांनी ट्रोल केले. तर काहींनी तिच्या जिद्दीला दाद दिली.